Dhind (धिंड)

(By Shankar Patil)

Book Cover Watermark PDF Icon
Download PDF Read Ebook

Note: If you encounter any issues while opening the Download PDF button, please utilize the online read button to access the complete book page.

×


Size 22 MB (22,081 KB)
Format PDF
Downloaded 598 times
Status Available
Last checked 9 Hour ago!
Author Shankar Patil

“Book Descriptions: शंकर पाटलांच्या मराठी मनांवर अधिराज्य करणार्‍या ढंगदार कथा.

“म्या दारूला शिवलो न्हाई. शप्पत सांगतो, मी घेतल्याली न्हाई. उगा इनाकारणी माज्यावर अदावत घेऊ नका.” राऊ खोतानं साफ झिडकारलं, तशी ती सारी चावडी खालवर झाली. लोक खदाखदा हसू लागले आणि राऊ खोतच म्हणाला. “हसून दावू नका. खरं सांगतो, मी घेतल्याली न्हाई.”
रामभाऊ हसून म्हणाले, “गड्या, तुझं डोळं सांगत्यात की रं !”
“अण्णा, डोळं काय सांगत्यात ? गप, उगच गप्प बसा.”
“उतरंस्तवर गप बसावं म्हणतोस व्हय राऊ ?”
“अहो, काय चढलीय का मला ?”
“अजून चढली न्हाई म्हणतोस ?”
“अहो, त्याचं नावसुदिक घेऊ नग. शिवल्याला न्हाई म्या त्याला !”
एक सनदी पुढं झाला आणि मोठ्यानं म्हणाला, “शिवल्यालं न्हाईस तर मग दडून का बसला होतास ?”
“शेबास ! म्या काय दडून बसलो होतो काय ?”
“दडला नव्हतास तर मग माळ्यावर काय करत होतास ?”
“माळ्यावर काय करतोय ! गडद झोपलो होतो ?”
“मग खाली जागा नव्हती काय ?”
“ते तुम्हाला काय करायचं ? आम्ही खाली झोपू न्हाईतर वर झोपू !”
राऊ असं आडवं बोलला आणि सबंध चावडी पोट धरून हसू लागली.”