“Book Descriptions: भारतात जे अनेक चांगले क्रिकेटपटू तयार झाले त्यातला सुनील गावसकर हा एक श्रेष्ठ. 'सनी डेज्' हे त्याचं क्रिकेटवर लिहिलेलं अतिशय सुंदर व वाचनीय पुस्तक. त्या पुस्तकाचा खप फार प्रचंड झाला. फारच थोडे खेळाडू असे आहेत की, जे लिहू शकतात. गावसकर हा त्यापैकीच एक. तो स्वतः लिहितो आणि त्याचं लिखाण मोठं बहारदार असतं. 'आयडॉल्स' या पुस्तकात सुनील गावसकरनं क्रिकेट विश्वातल्या एकतीस उत्कृष्ट समकालीन खेळाडूंचं आपल्या चित्रमयी भाषेत शब्दचित्र रेखाटलंय. त्यांच्या कलेचं कौतुक केलंय. हे सगळे एकतीस खेळाडू तुमचे आमचे, सर्वांचे आवडते 'हिरोज्' आहेत. गावसकरही त्यांना मानतो. त्यांचं तंत्र, शैली आणि पद्धत गावसकरच्या मनात भरली आहे. त्यांच्या खेळातली कलाही गावसकरला भुरळ पाडते.” DRIVE